ठाणे महानगरपालिका


CLICK HERE TO APPLY ONLINE VIEW AND PRINT APPLICATION FORM

ठाणे महानगर पालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव नवीन वार्षिक प्रवेश अर्ज सूचना खालील प्रमाणे :

ठाणे महानगर पालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव ठाणे येथे नविन वार्षिक प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने दि.16/12/2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.22/12/2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज स्विकारण्यात येतील.

एकुण अर्जांपैकी कै. मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे येथे 250 अर्जदारांसाठी लॉटरी पध्दतीने प्रवेश देण्यांत येईल. सदर सोडत दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, खारटन रोड, ठाणे येथील पहिल्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलच्या समोरील मोकळी जागा या ठिकाणी दि. 26/12/2024 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत करण्यांत येईल

कै. मारोतराव शिंदे तरण तलाव तलावांचे नवीन वार्षिक प्रवेश अर्ज लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या 250 सभासदांनी कै. मारोतराव शिंदे तरण तलाव कार्यालयात रोख रक्कमे द्वारे दि. 01/01/2025 ते दि. 10/01/2025 या दिवसांचे कालावधीतच प्रवेश घेणे आवश्यक असुन मुदतीनंतर प्रवेश देण्यांत येणार नाही याची नोंद घ्यावी.

प्रवेश घेताना रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रत, जन्म दाखला/ वयाचा विहित नमुन्यातील वैद्यकिय दाखला व दोन पासपोर्ट साईज अद्यावत फोटो सादर करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय व जन्म दाखल्याची प्रत वेबसाईट वरुन डाऊनलोड करुन घ्यावी.

दि.16/12/2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दि.22/12/2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणेबाबत माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 9326206966 वर स‍काळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या कालावधीत संपर्क करणे.

कै. मारोतराव शिंदे तरण तलावबाबत व अधिक माहितीसाठी कै. मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे येथे संपर्क करावे. संपर्क क्रमांक - 022 2533 2052

कै. यशवंत रामा साळवी तरण तलावबाबत व अधिक माहितीसाठी कै. यशवंत रामा साळवी तरणतलाव, कळवा येथे संपर्क करावे. संपर्क क्रमांक – 022 2540 5893

टीप : - कोव्हीड-19 अंतर्गत कालावधीतील मुदतवाढ शिल्लक असलेल्या सभासदांचा नवीन प्रवेश अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

कैं. श्री. यशवंत रामा साळवी तरण तलाव ( कळवा)

CONTACT US

Marotrao Shinde Swimming Pool

Doctor Moose Marg, Near Talao Pali Lake, Thane West, Thane, Maharashtra 400604

Contact No : 022 25332052

Yashwant Rama Salvi Swimming Pool

40-A, Manisha Nagar Rd, Manisha Nagar, Kalwa, Thane, Maharashtra 400605

Contact No : 022 25405893